ads

Breaking News

VIDEO : पाचव्या टप्प्यात चार राफेल लढावू विमानं भारतात दाखल

नवी दिल्ली : लढावू विमानांची पाचवी तुकडी बुधवारी २१ एप्रिल भारतात दाखल झाली आहे. फ्रान्सच्या एका सैनिक एअरबेसहून या तुकडीनं उड्डाण घेतलं होतं. सलग ८००० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या लढावू विमानांना फ्रान्स आणि यूएई वायुसेनेच्या एअर-टू-एअर रिफ्युएलसाठी मदत मिळाली आणि भरत ही विमानं भारतात दाखल झाली. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी फ्रान्सच्या एका सैन्य विमानतळावर विमानांना झेंडा दाखवून रवाना केलं. ही विमानं भारतात दाखल झाल्यानंतर राफेल विमानांचा दुसरा स्क्वॉड्रन तयार करण्याचा मार्गही मोकळा झालाय. पहिला राफेल स्क्वॉड्रन एअरफोर्स स्टेशनवर स्थित आहे. या स्क्वॉड्रनमध्ये जवळपास १८ विमानं आहेत. भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांची एकूण संख्या आता १८ झालीय. भारतीय वायुसेनेकडून याबद्दल माहिती देण्यात आलीय. 'फ्रान्सच्या #MerignacAirBase वरून थेट उड्डाणानंतर राफेलची पाचवी तुकडी २१ एप्रिल रोजी भारतात दाखल झाली' असं वायुसेनेनं म्हटलंय. सोबतच फ्रान्स आणि यूएईच्या वायुसेनेलाही धन्यवाद दिले आहेत. या अगोदर राफेल लढावू विमानांची चौथी तुकडी ३१ मार्च २०२१ रोजी भारतात दाखल झाली होती. फ्रान्सच्या इस्ट्रेट एअरबेसहून ही विमानं भारतात पोहचली होती. त्याअगोदर २९ जुलै २०२० रोजी पाच राफेलची पहिली तुकडी भारताच्या ताब्यात मिळाली होती. एकूण ३६ विमानं खरेदी करण्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. फ्रान्सची 'दसॉ एव्हिएशन' ही कंपनी राफेलचं उत्पादन करते. राफेल विमानांची दुसरी तुकडी ४ नोव्हेंबर २०२० रोजी तर तिसरी तुकडी २७ जानेवारी २०२१ रोजी भारतात दाखल झाली होती.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QeCUKn

No comments