ads

Breaking News

घृणास्पद! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, अश्लील व्हिडिओ काढला

बाडमेर: राजस्थानमधील बाडमेरमधील शिव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचे करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या दुष्कृत्याचा व्हिडिओही काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पीडितेच्या भावाने या प्रकरणी तक्रार केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाने शिव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गावातीलच दोघांनी त्याच्या अल्पवयीन बहिणीचे अपहरण केले. त्यानंतर गावाजवळील जंगल परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले, असे त्याने तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेची कुठे वाच्यता केली तर तिच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. पीडितेला घेऊन तिचा भाऊ पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्यांनी गावातील दोघांविरोधात तक्रार दाखल केली. शिव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे देण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास करून सत्य समोर आणले जाईल, असे पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले. पीडितेच्या भावाने शिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपअधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पीडितेचा जबाब नोंदवून घेतला आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v772Gm

No comments