ads

Breaking News

कच्च्या तेलात तेजी ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे डॉलरसमोर होत असलेल्या अवमूल्यनाने पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. मात्र तरीही कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज शनिवारी नवव्या दिवशी आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग नवव्या दिवशी देशातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते. भारत हा जगातील तिसरा मोठा खनिज तेलाचा ग्राहक आहे. मात्र मागील काही दिवसांपासून देशात करोनाने कहर केला आहे. अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळे खासगी वाहतूक कमी झाली आहे. परिणामी इंधन मागणीवर देखील याचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान, अमेरिकन कमॉडिटी बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.७१ डॉलरच्या तेजीसह ६६.११ डॉलरवर बंद झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात तेजी दिसून आली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.७१ डॉलरने वधारला आणि प्रती बॅरल ६२.१४ डॉलर इतका झाला.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3sNMwJh

No comments