ads

Breaking News

मुंब्रा खाडीत तीन मुले बुडाली; दोघांचे मृतदेह हाती, एकाचा शोध सुरू

ठाणे: पोहण्यासाठी गेलेली तीन मुळे मुंब्रा येथील खाडीमध्ये बुडाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तीन मुलांपैकी दोन मुलांना खाडीमधून बाहेर काढण्यात आलं. भरतीची वेळ असल्यामुळं रात्री शोधकार्य थांबण्यात आलं होतं. बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही तिन्ही मुलं रेल्वे ट्रॅकच्या बाजूच्या खाडीत पोहायला गेली होती. रात्रीच्या वेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुलं बुडाली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान व पोलिस कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले आणि लगेच मदतकार्यास सुरुवात केली. वाचा: काही वेळाच्या शोधानंतर दोन मुलांचे मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आले. दाऊद अकबर सेलाफी (वय १६ वर्षे), मोहीम (वय १६ वर्षे) अशी या मुलांची नावं आहेत. बेपत्ता असलेला गुड्डू वझेर शहा (वय १५ वर्षे) हा मुलगा मुंब्रा, कोळीवाडा येथील रहिवासी आहे. भरती सुरू झाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळपासून पुन्हा एकदा तिसऱ्या मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uWJXGd

No comments