ads

Breaking News

पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : दिल्लीत घडलेल्या एका लज्जास्पद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतोय. या व्हिडिओत काही जणांकडून एका होताना दिसतेय. या व्हिडिओत आणखी एक पोलीस कर्मचारीही दिसतोय जो मारहाण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दिल्लीच्या उत्तम नगर पोलीस स्टेशन परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. या व्हिडिओत सोफ्यावर बसलेल्या पोलीस कर्मचारी मारहाण होत असल्याचं दिसतंय. 'गुरुजी हे योग्य होत नाही' असं म्हणताना हा पोलीस कर्मचारी दिसतोय. दोघांकडून मारहाण होत असताना पोलीस कर्मचारी हतबल दिसून येत आहे. पोलिसाच्या कंबरेवर पिस्तुलही दिसून येत आहे. तर मारहाण करणाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळही होत आहे. पोलीस कर्मचाऱ्यानं दारु प्यायल्याचा आरोपही मारहाण करणाऱ्यांकडून केला जात असल्याचं व्हिडिओतून समोर येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण होत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव सुशील असल्याचं व्हिडिओत दिसतंय. ते अगोदर उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. परंतु, सध्या ते बाबा हरिदास नगर स्टेशनमध्ये तैनात असल्याचं समजतंय. पोलिसांकडून मात्र अद्याप याची पुष्टी करण्यात आलेली नाही. द्वारकाचे पोलीस उपायुक्त संतोष कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ १ एप्रिल रोजीचा आहे. गेल्या बुधवारी तो समोर आला. ही घटना का घडली? मारहाण करणारे कोण आहेत? याबद्दल अधिक तपास सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेनं घेतलंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g8Nop2

No comments