पुलावरून जीप गंगेत कोसळली; ९ मृतदेह हाती, १०-१२ प्रवासी बेपत्ता
पाटणा : दानापूरच्या भागात मोठी घडल्याचं समोर येतंय. प्रवाशांनी खच्चून भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळून ही दुर्घटना घडलीय. या पिकअप व्हॅनमधून जवळपास २० प्रवासी प्रवास करत होते. यातील ९ जणांचे मृतदेह हाती लागलेत. तर अद्याप जवळपास १०-१२ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांच्या शोधार्थ ''कडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येतंय. दुर्घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं गंगेत बुडालेली गाडी बाहेर काढली. तसंच स्थानिकांच्या मदतीनं गंगा नदीत मृतदेहांचाही शोध घेण्यात आला. नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. जीपमधून प्रवास करत असलेले बहुतांश प्रवासी अकिलपूरचे रहिवासी असल्याचं समजतंय. एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली. गाडीच्या टपावर बसलेल्या प्रवाशांनी मात्र वेळीच सावध होत आपले प्राण वाचवले मात्र जीपच्या आत बसलेल्या लोकांना गंगेत समाधी मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. घटनेनंतर या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी झालीय. दानापूरचे आमदार रीतालाल यादव हेदेखील इथं उपस्थित झाले आहेत. कंत्राटदारांकडून पीपापूलचं निर्माण चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप होतोय. चढ असल्यानं अनेक गाड्या इथून घसरत असल्याचं सांगण्यात येतंय.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QTU9jN
No comments