हुश्श ! दोन आठवड्यानंतर ग्राहकांना दिलासा, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दरात कपात केली आहे. सलग १५ दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर आज कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. आज देशभरात पेट्रोल १६ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले. आजच्या दर कपातीनंतर गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपये आहे. ८७.८१ रुपये झाला. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात १६ वेळा इंधन दरवाढ केली होती. यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली होती. त्या १६ दिवसात पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले होते. तर डिझेलमध्ये या १६ दिवसांत झालेल्या दरवाढीने ४.५२ रुपयांची वाढ झाली होती. जागतिक कमॉडिटी बाजारात बुधवारी तेजी दिसून आली. कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ५ टक्क्यांनी वधारला. अमेरिकन कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव २.७० डॉलरच्या तेजीसह ६६.३७ डॉलरवर गेला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २.७० डॉलरच्या तेजीसह ६२.८८ डॉलर झाला.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3e7v6Se
No comments