ads

Breaking News

संतापजनक! १४ वर्षीय मुलीवर भावोजीसह त्याच्या मित्रांनी केला बलात्कार, १२ जणांविरोधात गुन्हा

नमक्कल: तामिळनाडूमधील जिल्ह्यात एका अल्पवयीन केल्याच्या आरोपांखाली १२ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिरुचेंगोडे येथील जिल्हा बालकल्याण अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. ती शाळा सोडल्यानंतर आपल्या मोठ्या बहिणीच्या सोबत राहात होती. तिथे तिच्या बहिणीच्या नवऱ्याने बलात्कार केला. मागील अनेक महिन्यांपासून तो तिचे लैंगिक शोषण करत होता. धक्कादायक म्हणजे त्याच्या तीन मित्रांनीही तिच्यावर लैंगिक केले. त्या तिघांनी पीडितेला धमकावले आणि तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलगी एका घरात काम करू लागली. त्या घरमालकानेही तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून मुलीला काही पैसे दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर काही दक्ष नागरिकांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हा बालकल्याण अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण पोहोचले. त्यांनी या प्रकरणी चौकशी करून तक्रार दाखल केली. यात १२ जणांना आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तिरुचेंगोडे महिला पोलिसांनी १२ आरोपींपैकी ११ जणांना अटक केली आहे. त्या सर्व आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. एका आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tjtE5W

No comments