ads

Breaking News

शरद पवारांची प्रकृती ठणठणीत; रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पक्षाचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. पवारांची प्रकृती उत्तम असल्याचंही त्यांनी मलिक यांनी सांगितलं आहे. () वाचा: पोटदुखीच्या तक्रारीनंतर शरद पवार यांना मागील महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर एन्डोस्कोपी करून त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ११ एप्रिल रोजी पुन्हा त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस रुग्णालयातच विश्रांती घेतल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाचा: पवार रुग्णालयात असताना देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. काही राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली होती. या शुभेच्छा व पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e6Gyxt

No comments