ads

Breaking News

तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह; बलात्कारानंतर हत्येचा संशय

लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊतील पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगी पुरम परिसरात ही घटना घडली आहे. गुरुवारी, २९ एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगी पुरम परिसरात एका मोकळ्या भूखंडावर एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच, तात्काळ पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांकडून मृत तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ज्या मोकळ्या भूखंडावर तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे, त्या भूखंडाच्या चारही बाजूंनी कुंपण आहे. तरुणीच्या डोक्यावर जखमा देखील आहेत. हा मोकळा भूखंड कुणाचा आहे, याची माहिती घेतली जात आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vnI8lQ

No comments