ads

Breaking News

भारतीय नौसेनेची मेडिकल टीम सज्ज; अहमदाबादच्या 'पीएम कोविड' सेंटरमध्ये तैनात

: करोनासारख्या संकटसमयी नागरी प्रशासनासाठी सशस्र दलाची मदतही अत्यंत महत्त्वाची ठरतेय. करोना संकटादरम्यान भारतीय नौदलाची मेडिकल टीमही नागरिकांच्या मदतीसाठी मैदानात उतरलीय. पश्चिम नौसेनेच्या ५७ सदस्यांचा समावेश असलेली एक अहमदाबादमध्ये तैनात करण्यात आलीय. या मेडीकल टीममध्ये ४ डॉक्टर, ७ नर्सेस, २६ पॅरामेडकल स्टाफ आणि २० सपोर्टिंग स्टाफचा समावेश आहे. या टीमला गुजरातमधल्या सर्वात मोठं शहर असलेल्या अहमदाबादमध्ये तैनात आलं आहे. मुंबईस्थित ''कडून ही माहिती देण्यात आलीय. अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या 'पीएम केअर्स कोविड रुग्णालयात' नौसेनेची ही टीम तैनात करण्यात आलीय. सध्यातरी पुढच्या दोन महिन्यांकरता ही टीम रुग्णालयात रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयातील डॉक्टरांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आलीय. गुजरातमध्ये वाढत्या करोना संक्रमणाला तोंड देण्यासाठी हे 'पीएम केअर्स' हे विशेष कोविड रुग्णालय उभारण्यात आलंय. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३ लाख ८६ हजार ४५२ संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली तर याच दिवशी ३४९८ रुग्णांनी आपले प्राण गमावले. शुक्रवारी २ लाख ९७ हजार ५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात (६,७,३०१), कर्नाटक (३,४९,४९६), उत्तर प्रदेश (३,०९,२३७), केरळ (२,८४,०८५), राजस्थान (१,६९,५१९) तर गुजरातमध्ये (१,३७,७९४) अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u8hD3t

No comments