ads

Breaking News

PM-CM बैठक : 'प्रोटोकॉल' तोडताना मोदींनी केजरीवालांना रोखलं!

नवी : करोना संक्रमणाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर यांनी आज दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ही बैठक सुरू असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्या संबोधनाचा काही भाग टीव्हीवर लाईव्ह दिसला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांचं संबोधन रोखत त्यांना 'प्रोटोकॉल'ची आठवण करून दिली. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माफी मागावी लागली. अधिक वाचा : 'आपली परंपरा आणि प्रोटोकॉलच्या विरुद्ध एखादा मुख्यमंत्री आपल्या इन हाऊस बैठकीतील भाग लाईव्ह टेलिकास्ट करत आहे. हे योग्य नाही, आपल्याला नेहमीच संयम बाळगायला हवा' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्यानंतर 'ठीक आहे. आम्ही भविष्यात काळजी घेऊ' असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी खेद व्यक्त केला. या बैठकीनंतर केंद्राकडून अरविंद केजरीवाल हे राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. 'या प्लॅटफॉर्मचा वापर केजरीवाल राजकारण करण्यासाठी आणि खोट्या दाव्यांसाठी करत आहेत', असं सरकारशी निगडीत सूत्रांनी 'एएनआय'शी बोलताना म्हटलं. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असूनही 'हतबल' असल्याची भावना व्यक्त करतानाच 'दिल्लीत येणारे ऑक्सिजन टँकर इतर राज्यांत रोखले जात असतील तर मी केंद्र सरकारमध्ये कुणाशी बोलायचं?' असा सवालही पंतप्रधानांसमोर उपस्थित केला. तसंच करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात एक 'राष्ट्रीय योजना' आखणं आवश्यक असल्याचं सांगत देशातील सर्व ऑक्सिजन प्लान्टची जबाबदारी सेनेच्या ताब्यात देण्याची गरज अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केली.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ayjV4q

No comments