ads

Breaking News

vk singh : 'प्लीज, हेल्प करा...', केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंहांच्या ट्वीटवरून वाद, ट्रोलर्सना सुनावलं

नवी दिल्लीः करोना संसर्ग झालेल्या एका व्यक्तीला गाझियाबादमध्ये बेड मिळत नसल्याने केंद्रीय मंत्री यांनी ट्वीट केलं होतं. व्ही. के. सिंह ( ) यांनी ट्वीट करून जाहीरपणे मदतीची मागणी केली. या ट्वीटवरून मोठा वाद निर्माण झाला. यानंतर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी आणखी एक ट्वीट करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. तसंच त्यांनी आधी केलेलं ट्वीट हे डिलिट करण्यात आलं. कृपया मदत, करा माझ्या भावाला करोनावरील उपचारासाठी बेड मिळत नाही. गाझियाबादमध्ये कुठलीही व्यवस्था होत नाही, असं ट्वीट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केलं. त्यांनी गाझियाबादच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना ट्वीटमध्ये टॅग केलं. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं. तसंच ट्वीटवरून व्ही. के. सिंह यांना ट्रोल करण्यात आलं. आपल्या ट्वीटवरून मोठा वाद निर्माण होत असल्याचे पाहून व्ही. के. सिंह यांनी आणखी ट्वीट केलं आणि त्यातून टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. तसंच आधीचं ट्वीट त्यांनी डिलिट केलं. बौद्धीक पातळी बघून चकीत, सिंह यांचे ट्रोलर्सना उत्तर व्ही. के. सिंह यांनी केलेल्या ट्वीटवरून सोशल मीडियावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं. यावरून व्ही. के. सिंह यांनी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. आपल्या ट्वीटवरून मोठा वाद निर्माण केला गेला. पण यावरून सर्वांची बौद्धीक पातळी उघड झाल्याने चकीत झालो. आपण दुसऱ्या कुणचं तरी ट्वीट हे गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून फॉरवर्ड केलं होतं. त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, असं आपण आवाहन केलं. आपण यासाठी केलेलं ट्वीट हे हिंदीत होतं. यूपीचे मुख्यमंत्री कार्यालय आणि गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेडची व्यवस्था करून दिली आहे. त्यांची प्रकृती आहे स्थिर आहे. काहींनी जो काही गैरसमज केला गेला आहे, तो आता दूर होईल, असं व्ही. के. सिंह यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ai94LO

No comments