West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान
कोलकाता : देशातील वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज (शनिवारी) पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील पार पडतंय. पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान याअगोदर पार पडलंय तर अजून १५९ जागांवर मतदान बाकी आहे. मतदानाच्या चौथ्या टप्प्यात सितलकुची भागात झालेल्या गोळीबारानंतर निवडणूक आयोगानं पाचव्या टप्प्यात सुरक्षा आणखीन वाढवली आहे. या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसेचा प्रकार घडल्याचं दिसून येतंय. LIVE अपडेट : - पश्चिम बंगामध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पाच उमेदवार करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील तीन जण तृणमूल काँग्रेसचा, एक रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) तर एक जण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील नागरिकांना, खासकरून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येत आपल्या मताधिकाराचा वापर करण्याचं आवाहन केलंय. - सकाळी ७.०० वाजता मतदानाला सुरूवात होईल. सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहील - या पाचव्या राज्यातील सहा जिल्ह्यांतील एकूण ४५ जागांवर मतदान होणार आहे - पाचव्या टप्प्यातील सगळे मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत - पाचव्या टप्प्यात एकूण १ कोटी १३ लाख ७३ हजार ३०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत - मतदानाच्या पाचव्या टप्प्यात एकूण ३४२ उमेदवारी आपलं भविष्य आजमावत आहेत - मतदानासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण १५,७८९ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत राज्यात २२ एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यात ४३ जागांवर, २६ एप्रिल रोजी सातव्या टप्प्यात ३६ जागांवर तर २९ एप्रिल रोजी आठव्या टप्प्यात ३५ जागांवर मतदान होणार आहे. तर २ मे रोजी पाचही राज्यांचे निकाल जाहीर होतील. याच दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ६,९१० नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत तर २६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x5GRBp
No comments