सीबीआयचे माजी संचालक रंजीत सिन्हा यांचं निधन
नवी दिल्ली : (CBI) चे माजी अध्यक्ष यांचं निधन झालंय. १९७४ च्या बॅचचे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी रंजीत सिन्हा यांनी आज पहाटे ४.३० वाजल्याच्या सुमारास दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ६८ वर्षांचे होते. रंजित सिन्हा यांनी तसंच (ITBP) चे महासंचालक म्हणूनही जबाबदारी हाताळली होती. २२ नोव्हेंबर २०१२ रोजी पुढच्या दोन वर्षांसाठी त्यांना सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाचं नेतृत्वही केलं होतं तसंच पाटणा, दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदांची जबाबदारीही हाताळली होती. रंजीत सिन्हा हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादातही अडकले होते. सीबीआयनं त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. सीबीआयच्या संचालकपदी असताना कोळसा खरेदी घोटाळ्याची चौकशी प्रभावित करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. १९७४ च्या बॅचचे निवृत्त आयपीएस अधिकारी सिन्हा यांच्या संशयित भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले होते. या आदेशानंतर तीन महिन्यांनी सिन्हा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q69sWJ
No comments