ads

Breaking News

बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा, फार्मा कंपनीच्या मालकाला अटक

इंदूर: करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचीही मागणी वाढत आहे. रुग्णांचे नातेवाइक रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अधिक पैसे मोजत आहेत. सरकार इंदूरमध्ये इंजेक्शन मागवून रुग्णांना उपलब्ध करून देत आहे. त्याचवेळी काही एका कंपनीकडून पुरवले जात होते. पोलिसांनी ४०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन ताब्यात घेतले असून, एका व्यक्तीला अटक केली आहे. करोना रुग्णांना आवश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतानाच, आरोपी बनावट इंजेक्शन पुरवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून ४०० बनावट इंजेक्शन जप्त केले आहेत. विनय त्रिवेदी याला अटक केली आहे. तो एका फार्मा कंपनीचा मालक आहे. पीथमपूर येथे त्याचा प्लांट आहे, अशी माहिती मिळते. इंदूरच्या क्राइम ब्रांच पोलिसांनी बनावट रेमडेसिव्हिरचे ४०० इंजेक्शन जप्त केले असून, फार्मा कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. हिमाचलच्या कांगडामध्येही आरोपीचा एक प्लांट आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीकडे ४०० बनावट व्हॉयल आढळून आले आहेत. इंदूरचे आयजी हरिनारायण चारी मिश्र यांनी सांगितले की, पोलिसांनी डॉक्टर त्रिवेदी याला खंडवा रोड येथून अटक केली आहे. त्याच्याकडे सापडलेल्या इंजेक्शनची कागदपत्रे तो सादर करू शकला नाही. पोलीस आरोपीकडे चौकशी करत आहेत. पोलिसांनी त्याच्याकडील २५ बॉक्स जप्त केले आहेत. इंदूरमध्ये त्याने असे किती इंजेक्शन पुरवले आहेत, याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच, संपूर्ण देशभरात रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढलेली आहे. करोना रुग्णांवरील उपचारासाठी हे इंजेक्शन रामबाण मानले जात आहे. भोपाळ-इंदूरमध्ये या इंजेक्शनसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सरकारी पातळीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मोठी खरेदी केली जात आहे. आता सर्व सरकारी रुग्णालयांत हे रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे सांगितले जात आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QrJXin

No comments