भाजप आमदारानं ट्वीट केला पर्रीकरांचा 'तो' फोटो; उद्धव ठाकरेंवर निशाणा
जळगाव: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून राजकारणही शिगेला पोहोचलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते व विरोधी पक्ष भाजपचे नेते या-ना-त्या कारणावरून एकमेकांना लक्ष्य करत आहेत. मुख्यमंत्री हेही विरोधकांच्या टीकेतून सुटलेले नाहीत. भाजपचे खासदार नारायण राणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव सातत्यानं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असतात. आता जळगावचे भाजपचे आमदार यांनीही मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. वाचा: करोनाच्या काळात मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थान किंवा वर्षा बंगल्यावरून कामकाज पाहत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नेते व अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. यावरूनच भाजपनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. घरात बसून लोकांची दु:ख कशी कळणार, असा सवाल भाजपनं केला आहे. दुसरीकडं, सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडंच कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. घरातील काही सदस्य कोविडशी झुंजत असताना मुख्यमंत्री धीरोदत्तपणे परिस्थितीला सामोरे जात आहेत, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. तसंच, भाजपला टोलाही हाणला होता. वाचा: त्यानंतर आता आमदार सुरेश भोळे यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यांचा फोटो ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. पर्रीकराचा फोटो ट्वीट करून भोळे म्हणतात, 'डोळे भरून येणारच. प्रकृती नाजूक असताना देखील काम करायचं असतं, प्रजेसाठीच मुख्यमंत्री असतो हे समजून घ्यायचं असतं! घरी बसून प्रकृती सांभाळणारा मुख्यमंत्री जनतेला नको असतो.' 'आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा एक समाजसेवी मुख्यमंत्री स्व. मनोहरजी पर्रीकर...' असं शेवटी त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dysi1v
No comments