अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का, नागपूरच्या निवासस्थानी ईडीचा छापा
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुर मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. यामध्ये आता काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यातील वडाळी वडाविहिरा इथे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा आहे, घरं आहेत, यावर अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून इथे सर्च मोहीम सुरू आहे. यामध्ये काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ijdtRS
No comments