तक्रार देणाराच निघाला दरोड्याचा मास्टरमाईंड; असा झाला उलगडा
यवतमाळ /प्रतिनिधीः अकोलाबाजार ते तळणी रोडवरील पेट्रोलपंपाच्या समोर दुचाकीने जात असताना एका ऊस तोडणी मुकादमास तसेच त्याच्या एका साथिदारास सहा जणांनी लुटल्याची तक्रार त्यांनी वडगाव जंगल पोलिसात दिली. त्यावेळी त्यांच्याजवळून सहा जणांनी तीन लाख २० हजार लुटले तसेच त्यांना मारहाणही केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी चौकशी केल्यावर तक्रार देणाराच दरोड्याचा मास्टरमाईड असल्याचे निष्पन्न झाले. यातील पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, दोन आरोपी फरार आहेत. अजय राजु तायकोटे (२७) रा. सावरगड, ता.जि. यवतमाळ असे या मास्टरमारमाईचे नाव आहे. अजय तायकोटे हा ऊस तोडणी मुकादम असून, तो व त्याचा एक साथीदार दुचाकीने साळभावाने दिलेला कामगारांचा अॅडव्हान्स देण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांना अकोलाबाजार ते तळणी रोडवर लुटल्याचं सांगत वडगाव जंगल पोलिसात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाला गती दिली. तसेच अजय तायकोटे व त्याच्या साथिदाराची चौकशी केली असता त्यांच्या देहबोलीत व बोलण्याच्या पद्धतीत तफावत दिसून येत होती. तेव्हा पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मित्रांच्या मदतीने हा कट रचल्याचे कबूल केले. वाचाः पोलिसांनी राजू तायकोट व त्याच्या साथिदाराला ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध सुरू केला. या गुन्ह्यातील पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, विवेक देशमुख, विनोद राठोड, उल्हास कुरकुटे, सलमान शेख, किशोर झेंडेकर, निखील मडसे, मंगीलाल राठोड, अक्षय डोंगरे, निलकमल भोसले, संतोष ढाले अवधूतवाडी ठाण्यातील सागर चिरडे, समाधान कांबळे सहभागी झाले. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bm93Xa
No comments