ads

Breaking News

नांदेडमध्ये पावसाचं रौद्ररुप, वाहून गेलेल्या पिता-पुत्राचे मृतदेह अखेर सापडले

नांदेड : राज्यातील इतर भागांप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मुखेड उस्माननगर रस्त्यावरील मोती नाल्याला पूर आला. या पुरात एक कार वाहून गेली. या कारमधील २ जण वाहून गेले तर एकाने झाडाचा आधार घेतल्याने त्याला मदत पथकाने दोरीच्या साहाय्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढलं आहे. यामध्ये मुखेड तालुक्यातील मोती नाल्याच्या पुराच्या पाण्यात कारसह वाहून गेलेले पिता पुत्रांचा मृतदेह सापडला आहे. नाल्यापासून ५०० मिटर अंतरावर दोन्ही मृतदेह सापडले आहेत. भगवान राठोड आणि संदीप राठोड या पिता पुत्राचा मृतदेह सापडला असून २४ तासानंतर हे मृतदेह सापडले. मृत पावलेले पितापुत्र माजी आमदार किशन राठोड यांचे मुलगा आणि नातू आहेत. कारसह वाहून गेलेल्या व्यक्तींमध्ये मुखेडचे माजी आमदार किशनराव राठोड यांचा मुलगा तथा भाजपचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांचे संख्ख्ये चुलत बंधू भगवान राठोड ( ६५ ) तसंच त्यांचा मुलगा संदिप राठोड ( ३८ ) यांचा समावेश आहे. नेमकं काय घडलं? मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथून राठोड पितापुत्र त्यांच्या घरातील कामगार उद्धव देवकते याला घेऊन कारने कमळेवाडी येथून पांडुर्णी मार्गे मुखेडकडे येत होते. सकाळी कार मुखेडनजीक असलेल्या मोती नाल्याजवळ आली असता संदिप राठोड यास पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. वाहून गेलेली कार सापडली असली तरी अद्यापही राठोड पितापुत्र सापडले नाही.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WZIX8q

No comments