ads

Breaking News

आषाढी एकादशीः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

पंढरपूरः पंढरपुरात आज निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. पंरपरेला अनुसरुन यांनी सपत्नीक महापूजा केली. आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिरातील विणेकर शिवदास सोलते आणि इंदुबाई कोलते या दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सोमवारी रात्री उशिराने सर्वच मानाच्या संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या तर मुख्यमंत्रीही उशिराने पंढरीत आले. टाळ-मृदंगाच्या गजरात विना केवळ ४०० वारकरी भक्तांचे उपस्थितीत आज मंगळवारी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे. पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संताच्या पादुकांचे स्वागत देखील यंदा पंढरीत वारकर-यांच्या अनुपस्थित झाले. वाचाः करोना संसर्गामुळं मोजक्या लोकांच्या उपस्थितित महापूजा पार पडली. यावेळी विठुरायाच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली. चंद्रभागेत स्नानाला मनाई, चंद्रभागा झाली बंदिस्त सध्याच्या करोना संकटामुळे यंदाची आषाढी मर्यादित स्वरुपात साजरी होत असल्याने बाहेरच्या कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश दिलेला नाही. मात्र आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमधील भाविकांनीही चंद्रभागेत स्नानाला जाऊ नये, यासाठी चंद्रभागेचे सर्व घाट लोखंडी बॅरेगेंटिंग लावून बंद करण्यात आल्याने आता चंद्रभागा बंदिस्त झाली आहे. चंद्रभागेत प्रवेश करणारे सर्व घाट आणि मार्गांवर लोखंडी बॅरेगेंटिंग लावून मोठा पोलिस बंदोबस्त या घाटांवर ठेवण्यात आला आहे. यामुळे शासनाने परवानगी दिलेल्या १० मानाच्या पालखी सोहळ्यातील ४०० वारकऱ्यांनाच केवळ चंद्रभागेत पादुका स्नानासाठी सोडले जाणार आहे. आषाढी एकादशीला या सर्व पादुकांना चंद्रभागेच्या पात्रता स्नान घालण्याची परंपरा आहे. तेवढ्याच वारकऱ्यांना चंद्रभागेपर्यंत जाता येणार आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iy0cFc

No comments