पंतप्रधान मोदी आज वाराणसीत, १५०० कोटींच्या योजनांचं उद्घाटन
नवी दिल्ली : आज आपल्या लोकसभा मतदारसंघाचा अर्थात वाराणसीचा दौरा करणार आहेत. या दरम्यान ते १५०० कोटींहून अधिक रुपयांच्या अनेक विकास परियोनांचं उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत. आगामी वर्षात उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय. उत्तर प्रदेशात भाजपच्या विधासनभा निवडणूक मोहिमेची सुरुवात म्हणून पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे पाहिलं जातंय. या निमित्तानं यंदाच्या वर्षात आपल्या मतदारसंघात मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान ज्या विकास करणार आहेत, त्यात बनारस हिंदू विद्यापीठातील १०० बेडच्या एमसीएच विंगचाही समावेश आहे. सकाळी ११.०० वाजल्याच्या सुमारास पंतप्रधान बीएचयूमध्ये १०० बेडसहीत एमसीएच विंग, गोदौलियात एक बहुस्तरीय पार्किंग, गंगा नदीत पर्यटनाच्या विकासासाठी रो-रो नौका तसंच वाराणसी-गाझीपूर महामार्गावर तीन लेनसहीत फ्लायओव्हर पूलसहीत वेगवेगळ्या सार्वजनिक योजनांचं उद्घाटन करणार आहेत. असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा दौरा सकाळी १०.३० वाजता : विमानतळावर होणार दाखल सकाळी ११.०० वाजता : बीएचयू हेलीपॅड सभास्थळाचा शिलान्यास (१५८३ कोटींच्या २८० योजनांचं उद्घाटन) सकाळी १२.१५ वाजता : रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटरचं लोकार्पण सकाळी ०२.०० वाजता : एमसीएच विंगमध्ये डॉक्टरांशी चर्चा सकाळी ०३.०० वाजता : पंतप्रधान काशीहून दिल्लीकडे रवाना होतील
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kjvh1G
No comments