बापाने चाकूने वार करून केली आईची हत्या; ३ मुलांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
: शहरातील टाकळीरोड शिवमपार्कच्या आतील बाजूस राहत असलेला चैतन्य आनंदा माने (वय ३८) याने पत्नी पूजा चैतन्य माने हिचा दारूच्या नशेत चाकूने भोसकून खून (Sangali Murder) केला. खून करून चैतन्य माने हा तेथून फरार झाला. या घटनेमुळे मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद मिरज शहर पोलिसात नोंद घेण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चैतन्य माने हा टेलरींग व्यवसाय करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. माने दाम्पत्याला दोन मुली व एक मुलगा आहे. चैतन्य माने याचे वडील आनंदा व आई हे दोघेजण भंगार गोळा करण्याचेकाम करतात. चैतन्य हा घरातून बाहेर गेला की तो आठ ते दहा घरी येत नव्हता. दारूच्या नशेत कुठेही फिरत होता. घरी आल्यानंतर तो पत्नी पूजा हिच्याशी तसेच घरातील आई-वडील यांच्याशी वारंवार भांडण करत असत. रविवारी दुपारी चैतन्य हा घरी आल्यानंतर त्याने पत्नीशी वाद घातला, पत्नीला बाहेर बोलावून घेतलं आणि सरळ तिच्यावर चाकूने पोटात, मानेवर, पाठीवर आणि मांडीवर सपासप वार केले. चाकूने मारत असताना त्यांची आजी बाहेर आली आणि आरडाओरडा करू लागली. त्यानंतर चैतन्य हा जोरजोरात आरडा ओरडा करत सपासप चाकूने वार करून तेथून पसार झाला. या हल्ल्यानंतर शेजारी राहणारे लोक गोळा झाले. सर्वजण येत असल्याचे बघून आरोपी चैतन्य माने तेथून पळून गेला. पूजा ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला बोलायला येत नव्हते. हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती. शेजारी असलेले अशोक हिरीगडे यांनी गाडी घेवून तिला मिरज मिशन रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झासा. पूजाचा मृत्यू झाल्याची माहिती घरात समजल्यानंतर लहान मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पूजा हिची तीनही मुले लहान आहेत. एकतर लहान मुलगा पाळण्यामध्ये झोपलेला होता. दरम्यान, या घटनेनं परिसरात संतापाची लाट पसरली असून आरोपी चैतन्य मानेवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील लोकांकडून करण्यात येत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kxXPEW
No comments