ads

Breaking News

बड्या नेत्याला रात्री अटक होऊ शकते; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?

नाशिक: मनसे जोपर्यंत परप्रांतीयांसंदर्भात आपले धोरण बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी युती शक्य नाही. मात्र, राजकारणात काहीही घडू शकते, असे सांगतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी यांचे नाशिकमध्ये कौतुक केले. स्थानिक पातळीवर अॅडजस्टमेंट होत असतात, असे सांगून नाशिकसह आगामी काही महापालिका निवडणुकांमध्ये संभाव्य भाजप-मनसे युतीबाबतही त्यांनी सूतोवाच केले. राज ठाकरे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व आहे. मात्र, ते एकटे राज्यात एकहाती सत्ता आणू शकत नाहीत, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते, असे वक्तव्य पाटील यांनी यावेळी एका प्रश्नावर बोलताना केल्याने त्यावर अनेक तर्क लावले जात आहेत. ( ) वाचा: भाजपची संघटनात्मक बैठक व पक्षकार्याचा आढावा घेण्यासाठी पाटील यांचे शुक्रवारी रात्री उशिरा शहरात आगमन झाले. तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले. भाजप नेत्या यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते गोठविण्यात आल्याबद्दल त्यांना विचारणा केली असता, केवळ मुंडेच नव्हे तर अनियमित कारभार करणाऱ्या राज्यातील ९० टक्के कारखान्यांवर कारवाई होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पंकजाताई नव्हे, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज असून, कारखान्याला बजावण्यात आलेली नोटीस आणि नाराजीचा संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. वाचा: रात्रीतून बड्या नेत्याला अटक होऊ शकते स्वायत्त संस्था आहे. ती केंद्राच्या अखत्यारित काम करते. त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सकाळी पुन्हा माझ्याकडे प्रतिक्रियेसाठी यावे लागू शकते, असे पाटील यांनी जाता जाता पत्रकारांना मिश्कीलपणे सांगितले. त्यामुळे नेमक्या कोणत्या नेत्याला अटक होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. पाटील उवाच... - एकट्या राज यांच्या नेतृत्वाखालील सरकार शक्य नाही. - राज व्यापक राजकारणात आले तर युती शक्य. - योग आला तर राज यांची नाशिकमध्ये भेट घेईन. - शिवसेनेशी आमचे वैर नाही, सरकारविरोधात आंदोलन. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3krvi3R

No comments