'मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात आहे हे विसरू नका'
राजगुरुनगर: 'मुख्यमंत्र्यांचा आम्हालाही आदर आहे पण, त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात आहे आणि पवारांच्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्री झाले आहेत, हे आमच्यावर टीका करणाऱ्यांनी विसरू नये', असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी आज केले. ( ) वाचा: पुणे-नाशिक महामार्गावरील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खेड घाट बाह्यवळण आणि नारायणगाव येथील बाह्यवळण मार्गाचे उद्घाटन आज करण्यात आले. घाटासाठी जमीन गेलेले शेतकरी देवराम थिगळे यांच्या हस्ते खेडमधील उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना लक्ष्य केले व त्यात मुख्यमंत्र्यांचेही नाव घेतले. 'खेड घाटाच्या बाह्यवळण मार्गाचे उद्घाटन हे कुठल्याही श्रेयवादाचा भाग नाही. श्रेय द्यायचे असेल, तर ते नितीन गडकरी यांनाच द्यायला हवे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आता वय झाल्याने अनधिकृतपणे उद्घाटन करण्याचा पोरकटपणा ते करत आहेत,' अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली. शिवसेनेने मतदारसंघात शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. महाविकास आघाडीची कामे लोकांपर्यंत पोहचावीत हा याचा उद्देश आहे. मात्र, शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा आम्हालाही आदर आहे. पण, त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचाच हात आहे, हेदेखील टीका करणाऱ्यांनी विसरू नये, असा इशाराच यावेळी कोल्हे यांनी दिला. वाचा: डॉ. कोल्हे म्हणाले, 'जुलै २०२० मध्ये या कामाची वर्क ऑर्डर झाली आहे. त्यानंतर दोन वेळा कामावर समक्ष भेट देऊन अनेक अडचणी दूर केल्या. त्यामुळेच काम लवकर पूर्ण झाले. आढळराव पाटील हे १५ वर्षे खासदार असूनही त्यांना चाकणची वाहतूक कोंडी सोडविता आली नाही. बैलगाडा शर्यती, विमानतळ आणि रेल्वे या कामांत फक्त राजकारण करण्यात येत आहे. मोशी, चाकण ते राजगुरुनगर या सहापदरी सस्त्यासाठी ६६० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला आहे. बाह्यवळणाचा प्रश्न यांच्या सहकार्याने मार्गी लावला. मुख्यमंत्री तुमचे आहेत, विकासकामे करा. निवडणुकीत राजकारण करू.' वाचा: 'खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिकेतील काम आता थांबवून आपला शंभर टक्के वेळ मतदारसंघाला द्यावा,' अशी अपेक्षा आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली. 'माझ्या काळात तयार झालेल्या इमारतींचे उदघाटन दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे व आढळरावांनी केले. मी यांच्यासारखी नौटंकी केली नाही. घाटाचे उद्घाटन करून त्यांनी काय साधले हे कळत नाही. निष्क्रीय आढळरावांच्या या नौटंकीचा जाहीर निषेध करतो. रस्त्यातील अडथळे जेसीबीने काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांचे पोलिस संरक्षण काढावे. आंबेगावात सहकार्य, तर खेडला विरोध हे दुटप्पी धोरण योग्य नाही,' अशा शब्दांत दिलीप मोहिते यांनी शिवसेनेतर्फे शुक्रवारी करण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर टीका केली. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कैलास सांडभोर, अरुण चांभारे, विनायक घुमटकर, दिलीप मेदगे आदी उपस्थित होते. लाज कशी वाटत नाही: आढळराव मी केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला विरोधकांना लाज कशी वाटत नाही. मागील दीड वर्षांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एकही ठोस काम केले नाही. ते केवळ बोलण्यात पटाईत आहेत. त्यामुळेच पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव आणि खेड बाह्यवळण मार्गांच्या कामांचे श्रेय घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xNLmAJ
No comments