देशात असं कधी घडलं नाही; राष्ट्रवादीचं राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
सातारा: नियुक्त १२ सदस्यांबाबतच्या राज्य सरकारच्या शिफारशीवर राज्यपाल यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने मधून सातत्याने त्यावर आक्षेप नोंदवण्यात येत आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी आज पुन्हा एकदा भाष्य करताना राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ( ) वाचा: सातारा येथे पत्रकारांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर काहीसा नाराजीचा सूर काढला. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने राज्यपालांना आठवण करून दिली आहे. त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे, असा सवालच जयंत पाटील यांनी केला. वाचा: देशात आणि राज्यात आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा अशाप्रकारचा अनुभव कधी आला नाही. राज्य सरकारकडून एखादी शिफारस करण्यात आल्यानंतर इतका विलंब होऊनही त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळेच इतका उशीर हा निर्णय घेण्यास का लागतोय, असा प्रश्न उपस्थित होतो, असे जयंत पाटील यांनी विचारले. आमच्या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नावे पाठवण्यात आली आहेत. या नियुक्त्या राज्यपालांकडून रखडल्या आहेत. राज्य सरकारचा शिफारशी करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर निर्णय प्रलंबित राहिल्याने गदा येतेय का? हा खरा प्रश्न आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rhdmtP
No comments