भारतातील करोना संक्रमणाचा वेग मंदावला, मात्र धोका कायम
नवी दिल्ली : भारतात करोना संक्रमणाचा धोका इतर देशांच्या तुलनेत कमी झाल्याचं दिसून येतंय. अद्याप धोका टळलेला नाही. दररोज भारतात जवळपास ४० हजारांच्या जवळपास लोकसंख्या नव्यानं संक्रमित होत आहे. आज (गुरुवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात बुधवारी (१४ जुलै २०२१) ४१ हजार ८०६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०९ लाख ८७ हजार ८८० वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ३२ हजार ०४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ५८१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ११ हजार ९८९ वर पोहचलीय. बुधवारी ३९ हजार १३० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ०१ लाख ४३ हजार ८५० वर पोहचलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील रिकव्हरी दरात वाढ होऊन हा दर ९७.२८ टक्क्यांवर पोहचलाय. तर अॅक्टिव्ह रुग्णांचा दर १.३९ टक्के आहे. देशात आठवड्याचा सध्या २.२१ टक्के आहे तर दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.१५ टक्क्यांवर आहे. सलग २४ व्या दिवशी दैनिक पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली असल्याचं दिसून येतंय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी ०९ लाख ८७ हजार ८८०
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी ०१ लाख ४३ हजार ८५०
- उपचार सुरू : ४ लाख ३२ हजार ०४१
- : ४ लाख ११ हजार ९८९
- करोना लसीचे डोस दिले गेले : ३९ कोटी १३ लाख ४० हजार ४९१
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eiADq0
No comments