व्यापाऱ्यांना शंभर दिवसांनंतर दिलासा?; कोल्हापूरबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः शंभर दिवसापासून बंद असलेली कोल्हापुरातील सर्व दुकाने सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री () यांनी सकाळी व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याचे संकेत दिले. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सकाळी व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ दुकाने बंद असल्यामुळे आमची दयनीय अवस्था झाली आहे, आर्थिक अवस्था बिघडली आहे, त्यामुळे तातडीने दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांनी केली. पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने सोमवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचे, आश्वासन मंत्री टोपे यांनी दिले. यामुळे सर्व दुकाने सोमवारपासून उघडण्याचे उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाचाः कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तीन महिन्यापासून राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. रोज दीड हजारावर करोना बाधित रुग्ण आढळत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य पथकाने दुसऱ्यांदा जिल्ह्याला भेट दिली. पॉझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा निर्वाळा या पथकाने दिला. पूर्वी १६ टक्के असलेला पॉझिटिव्हिटी दर आता दहा टक्क्यांवर आला आहे. शेकडा मृत्युदरही काही प्रमाणात कमी आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री टोपे आणि दुकाने उघडण्याचे संकेत दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुस्कारा सोडला. वाचाः दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास काहीही करा, पण आम्ही दुकाने उघडणारच, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती. पण आता मंत्र्यांनीच आश्वासन दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B8IlNf
No comments