ads

Breaking News

covid norm violations : केंद्राचा राज्यांना इशारा; 'गाफील राहू नका, करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा धोका'

नवी दिल्लीः बाजार, सार्वजनिक ठिकाणं आणि पर्यटन स्थळांवर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना ( centre raises with states ) सतर्क केलं आहे. अनेक ठिकाणी करोनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन ( covid norm violations ) होत आहे. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांनी आवश्यक पावलं उचलण्याती गरज असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. गैरसमजात राहिल्यास करोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची भीती आहे. देशातील अनेक भागांमध्ये खासकरून हिल स्टेशन, सार्वजनिक वाहतूक आणि बाजारांमध्ये करोनाच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. पण कुठल्याही गैरसमजात राहू नका. करोना रुग्णांच्या संख्ये पुन्हा मोठी वाढ होऊ शकते, असा इशारा राजेश भूषणा यांनी राज्य सरकारांना दिला आहे. करोना नियमांच्या उल्लंघनाचा मुद्दा केंद्राने राज्यांसमोर मांडला करोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि व्यवस्थापनासंबंधीच्या प्रोटोकॉलचं पालन करणं अत्यावश्यक आहे. यासोबतच चाचणी, देखरेख, उपचार, लसीकरण आणि कोरनासंबंधी अनुकूल वर्तनाचं पालन या पंच सूत्रीवर लक्ष देण्याची गरज आहे, असं भूषण यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना इशारा दिला होता. हिल स्टेशन आणि देशातील अनेक भागांमध्य करोना नियमांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. तसंच राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, असंही केंद्र सरकारने म्हटलं होतं. डॉ. गुलेरियांनी सांगितलं तिसऱ्या लाटेची कारणं रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करण्यास सक्षम असणाऱ्या करोना व्हायरस उभरून येणं आणि लॉकडाऊन सुलभ करणं ही करोनाच्या तिसर्‍या लाटेची संभाव्य कारणं असू शकतात, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले. देशात गेल्या दोन दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ४१,८०६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eocOx3

No comments