ads

Breaking News

narayan rane : नारायण राणेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; भेटीनंतर राणे म्हणाले...

नवी दिल्लीः केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ( ) यांनी गुरुवारी गृहमंत्री ( ) यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात नारायण राणे कॅबिनेट मंत्री झाले. यानंतर राणेंनी अमित शहांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती नारायण राणे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून दिली आहे. अमित शहा यांच्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट होती, असं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. हे मंत्रालय या आधी नितीन गडकरींकडे होते. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच अमित शहांची भेट घेतली. नारायण राणेंनी भेट घेतल्याचा फोटो अमित शहा यांच्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात नारायण राणेंना टॅग करण्यात आलं आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3en7jyX

No comments