mamata banerjee : ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर; शरद पवार, सोनिया गांधींसह विरोधी पक्ष नेत्यांना भेटणार
नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( ) संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांनी गुरुवारी याची माहिती दिली. आपल्याला भेटीची वेळ मिळाल्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटेन, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी या २५ जुलैला दिल्लीत येणार असल्याचं बोललं जात आहे. दिल्ली भेटीत त्या काँग्रेस अध्यक्ष ( ) , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( ) यांच्यासह विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. करोनाने निर्माण झालेली स्थिती आता सतत सुधारत आहे. हे पाहता संसदेच्या अधिवेशनावेळी दिल्लीला ( ) जाऊन तिथे नेत्यांची भेट घेईन, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममतांच्या भेटीचा अजेंडा हा २०२४ ची लोकसभा निवडणूक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ममतांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या विजयानंतर ममतांकडे तिसऱ्या आघाडीच्या नेत्या म्हणूनही बघितलं जात आहे. दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतरही नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना ममता दिल्लीत येत आहे. अधिवेशनात केंद्र सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. यावेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेते हे दिल्लीत असतील, असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. ममता बॅनर्जी दिल्लीत ४ दिवस असतील. दिल्लीत त्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यात आहे, असं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येतंय. संसदेचं अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होईल आणि १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36Gt6gO
No comments