ads

Breaking News

जळगाव: पुरात बैलगाडीसह शेतकरी दाम्पत्य वाहून गेलं; पत्नी बचावली पण...

जळगाव: शेतातून बैलगाडीने घरी परतणारे दाम्पत्य मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी साडेचार वाजता जिल्ह्यातील तालुक्यातील येथील खैरी नाल्यात घडली. या घटनेत सुदैवाने पत्नी बचावली आहे, तर पती पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या दुर्घटनेत बैलगाडीच्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. ( ) वाचा: निंभोरा येथील रहिवासी असलेले (वय ५५) व त्यांच्या पत्नी (वय ५०) हे शेतकरी दाम्पत्य आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेलेले होते. मुसळधार पावसामुळे निंभोरा ते खामखेडा या दोन्ही गावांच्या दरम्यान असलेल्या खैरी नाल्याला मोठा पूर आला होता. नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने भागवत पाटील यांनी बैलगाडी नाल्यात उतरवली. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. वाचा: या घटनेत मालुबाई पाटील या सुदैवाने बचावल्या. पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून गेल्यानंतर त्या नाल्याच्या काठावर असलेल्या झुडुपांमध्ये अडकल्या. तर भागवत पाटील व दोन्ही बैल पाण्यात दूरपर्यंत वाहत गेले. त्यामुळे दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला. तर वाहून गेलेले भागवत पाटील हे बेपत्ता आहेत. ही घटना शेतातून घरी परतणाऱ्या गावातील इतर शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने गावातील लोकांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर शोधकार्य राबवत ग्रामस्थांनी झुडुपांमध्ये अडकलेल्या मालुबाई पाटील यांना बाहेर काढत धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. वाचा: या घटनेची माहिती निंभोरा येथील पोलीस पाटील गुलाब सोनवणे यांनी तात्काळ महसूल तसेच पोलीस प्रशासनाला कळवली. त्यानंतर धरणगावचे प्रभारी तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ निंभोरा येथे धाव घेत घटनास्थळी भेट दिली. पुराच्या पाण्यात वाहून गेलेले भागवत पाटील यांचा शोध घेण्यात आला. परंतु, रात्री उशिरापर्यंत ते मिळून आले नाहीत. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ku4ZK2

No comments