ads

Breaking News

Youth With Dextrocardia: ह्रदय उजवीकडे असल्याने तरुणास सैन्यदलाने नाकारले; सैन्यदलाचे 'हे' स्पष्टीकरण

म.टा. प्रतिनिधी, नागपूर हृदय डाव्या बाजूला नाही तर उजव्या बाजूला झुकलेले असल्याने एका तरुणाला सैन्य दलात भरतीस अपात्र ठरविण्यात आल्याने या तरुणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. मात्र, जगातील सगळ्यात सक्षम जवानांपैकी एक अशी भारतीय सैन्यदलातील जवानांची ओळख आहे. कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना राज्यस्थान सारख्या अत्यंत उष्ण प्रदेशात तसेच सियाचीन सारख्या अत्यंत थंड प्रदेशातही काम करावे लागते. त्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. अशात एखादा सैनिक ‘अनफीट’ असल्यास संपूर्ण देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे उत्तर सैन्यदलाने न्यायालयापुढे सादर केले आहे. ( challenges decision in court and army clarify its stand in court) अजय तितरमारे, असे या याचिकाकर्त्या तरुणाचे नाव आहे. साधारणत: आपल्या हृदयाचा वरचा भाग हा डाव्या बाजूला झुकलेला असतो. मात्र, अजयच्या हृदयाचा वरचा भाग हा उजव्या बाजूला झुकलेला आहे. हृदयाच्या या स्थितीला ‘डेक्सट्रोकार्डिया आणि साइटस इनवर्सस’ असे म्हणतात. ही फार दुर्मिळ बाब असून जगातील फारच कमी लोकांच्या हृदयाची स्थिती अशी असते. क्लिक करा आणि वाचा- अजयने काही काळापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले. इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी झाली. यात ही बाब समोर आली. सैन्य दलाच्या वैद्यकीय निकषांनुसार त्याला अपात्र ठरविण्यात आले. मात्र, पुणे येथील ‘कमांड हॉस्पिटल’ने नोंदविलेल्या वैद्यकीय मतानुसार त्याला सैन्यदलासाठी अपात्र घोषित करण्यात आलेले नाही. यावर न्याय मिळावा म्हणून त्याने सैन्य दलाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. क्लिक करा आणि वाचा- सोमवारी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्यासमक्ष या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सैन्यदलाने आपले उत्तर सादर केले. अॅड. लक्ष्मी मालेवार यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xS9EJU

No comments