'राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणजे गाजराची पुंगी, कधीही विसर्जित होऊ शकतो'
पुणे: 'गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, अशी एक म्हण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचंही तसंच आहे. हा पक्ष जास्त दिवस टिकणारा नाही. कधीही विसर्जित होऊ शकतो,' अशी बोचरी टीका भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार यांनी केली आहे. ( attacks NCP and Pawar Family) जुन्नरमधील बेल्हा इथं झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा व जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना पडळकर बोलत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबीय हे पडळकरांचं एकमेव लक्ष्य राहिलं आहे. आमदारकी मिळाल्यापासून पडळकरांच्या टीकेला जास्तच धार आली आहे. प्रत्येक मुद्द्यावर पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसला व पवार काका-पुतण्यांना लक्ष्य करत असतात. जुन्नरमधील मेळाव्यातही त्यांनी तोच कित्ता गिरवत राष्ट्रवादीवर कडाडून हल्ला चढवला. वाचा: 'आमचा पक्ष लोकशाही पद्धतीनं चालणारा आहे असं राष्ट्रवादीवाले वारंवार सांगत असतात. मात्र या पक्षात खरंच लोकशाही आहे का? हा प्रश्नच आहे. या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कधीच बदलत नाही. या पक्षाची व्याख्याच वेगळी आहे. हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो,' असं भाकीतही त्यांनी वर्तवलं. वळसे पाटलांना दिला सावधगिरीचा इशारा राज्याचं गृहमंत्रिपद सांभाळणारे दिलीप वळसे पाटील यांना पडळकरांनी यावेळी सावधगिरीचा इशारा दिला. ते म्हणाले, 'राष्ट्रवादी सत्तेत असली की गृहखातं नेहमी त्यांच्याकडंच असतं. पैसे गोळा करेल आणि पोटात राहील, रोज नोटा बारामतीला पोहोच करेल, असा गृहमंत्री राष्ट्रवादीला हवा असतो. म्हणूनच पवारांनी अनिल देशमुख यांना शोधून काढलं. त्या आधी त्यांचं नाव तरी कुणी ऐकलं होतं का?, असा प्रश्न करतानाच, वळसे पाटलांनी सावध राहावं,' असा सल्लाही त्यांनी दिला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yS4M7k
No comments