ads

Breaking News

इंधन दर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव

मुंबई : जागतिक बाजारातील स्वस्त कच्च्या तेलाने पेट्रोलियम कंपन्यांचा आयातीचा खर्च काहीसा कमी झाला आहे. मात्र कंपन्यांनी तूर्त इंधन दरात कोणताही बदल केलेले नाही. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १५ पैसे कपात केली होती. गेल्या महिन्यात १८ ते २० ऑगस्ट असे तीन सलग दिवस डिझेल दरात २० पैसे कपात केली होती. त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर एकदा डिझेलमध्ये १५ पैसे आणि गेल्या बुधवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी १५ पैसे कपात करण्यात आली होती. वाचा : आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे. आज मुंबईत एक लीटर ९६.१९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.७१ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.०४ रुपये आहे. निर्बंध शिथिल झाल्याने इंधनाचा खप हळूहळू वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत वाढ झाली आहे. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण कायम आहे. आठवड्यच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव ७२.२२ डॉलर प्रती बॅरल इतका खाली आला. त्यात ०.३९ डॉलरची घसरण झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६९.२९ डॉलर प्रती बॅरलवर स्थिर होता.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3l1Fdvn

No comments