ads

Breaking News

पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराच्या घरावर बॉम्बहल्ला

कोलकाता : पश्चिम बंगालचे भाजप खासदार यांच्या घरावर बुधवारी सकाळी बॉम्बहल्ला घडवून आणण्यात आल्याचं समजतंय. खुद्द अर्जुन सिंह यांनी या हल्ल्याची माहिती देताना तृणमूल काँग्रेस आणि राज्यातील मुख्यमंत्री सरकारवर निशाणा साधलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी खासदार आणि प्रदेश भाजप उपाध्यक्ष अर्जुन सिंह घरात नव्हते. परंतु, त्यांच्या कुटुंबातील सदस्य यावेळी घरातच होते. राज्यपालांकडून घटनेची निंदा बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार कमी होण्याचं नाव घेत नाही. आज सकाळी खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाच्या बाहेर बॉम्बस्फोटाची घटना कायदेव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे. लवकरात लवकर या घटनेवर कारवाईची अपेक्षा करतो, असं धनखड यांनी म्हटलंय. पोलिसांचा तपास सुरू दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहचत या घटनेची तपासणी सुरू केलीय. चौकशीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही वापर केला जातोय. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वीही अर्जुन सिंह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता पोटनिवडणुकीपूर्वी हा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. 'ठार मारण्याचा प्रयत्न' पोटनिवडणुकीपूर्वी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. नुकतीच पक्षाकडून माझ्यावर भवानीपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बंगाल सरकार या प्रकरणाची तपासणी करतानाच हे प्रकरण बाजूला सारण्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकरणाची ना एफआयआर दाखल होणार ना चार्जशीट, असंही त्यांनी म्हटलंय. भवानीपूरमध्ये नुकतीच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलीय. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल तर ३ ऑक्टोबर रोजी या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडेल. अर्जुन सिंह हे १७ व्या लोकसभेत पश्चिम बंगालच्या बरैकपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढली आणि जिंकली. तत्पूर्वी सिंह तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून २००१ पासून सलग चार वेळा भाटपार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. १ जून २०२० रोजी त्यांना पश्चिम बंगालमधील भाजपचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38Mu4ZZ

No comments