Karnal Kisan Mahapanchayat: हरयाणात खट्टर सरकारकडून आंदोलक शेतकऱ्यांच्या अडवणुकीचा प्रयत्न
नवी दिल्ली : २८ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांवर हरयाणा पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जविरोधात कर्नालमध्ये आज (मंगळवारी) पाचारण करण्यात आलीय. यावेळी, लघू सचिवालयाला घेराव घालण्याचा शेतकऱ्यांची योजना आहे. याच दरम्यान जिल्ह्या प्रशासनानं घोषित करत आंदोलक शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंद याशिवाय , कुरुक्षेत्र, कैथल, जिंद आणि पानीपत या भागांत इंटरनेट तसंच एसएमएस सेवा ठप्प करण्यात आलीय. मंगळवारी संपूर्ण दिवस (२४ तास) इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित राहील, असं हरयाणा सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. कलम १४४ लागू अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच किंवा त्याहून अधिक लोक एकत्र येण्यास कलम १४४ अंतर्गत बंदी घालण्यात आलीय. राष्ट्रीय महामार्ग ४४ (अंबाला - दिल्ली) या मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठीही प्रशासनानं सूचना जारी केलीय. कर्नाल शहरातून प्रवास टाळावा किंवा ७ सप्टेंबर रोजी आपल्या गंतव्य स्थानापर्यंत जाण्यासाठी इतर मार्गांचा वापर करावा, अशी प्रशासनाकडून प्रवाशांना देण्यात आलीय. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्या एका बैठकीत जाणाऱ्या नेत्यांना अडवताना राष्ट्रीय महामार्गावर हरयाणा पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या समूहावर लाठीचार्ज करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. यामध्ये १० हून अधिक शेतकरी जखमी झाले होते. यानंतर शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांची 'डोकी फोडण्याच्या' गोष्टी करताना आयुष सिन्हा एका व्हिडिओ क्लिपमध्ये कैद झालेत. शेतकऱ्यांना सिन्हा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WS4EHw
No comments