ads

Breaking News

आर्यन खानची थोड्याच वेळात सुटका; जामीन आदेशाची प्रत आर्थर रोड तुरुंगात जमा

मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. गुरुवारी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर होऊनही कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळं शुक्रवारची रात्रही तुरुगांत काढावी लागली होती. अखेर आज आर्यन खानची सुटका होणार आहे. आर्यन खानच्या जामीनाची प्रत आज जामीन पेटीत ठेवण्यात आली आहे. इतर कायदेशीर प्रक्रिया होऊन आर्यनच्या सुटकेचा आदेश या न्यायालयाकडून आर्थर रोड तुरुंगात पोहोचेपर्यंत सुटकेची वेळ निघून गेल्याने आर्यनला शुक्रवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागली होती. सुटकेच्या आदेशाची प्रत जेलच्या जामीन पेटीत जमा करावी लागणार होती. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी ५. ३५ पर्यंत वाट पाहण्यात आली, पण तो येऊ शकला नाही. त्यामुळं त्याला शनिवारी सोडण्यात आलं नव्हतं. वाचाः शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तुरुंग अधिकाऱ्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटी उघडली आहे. कालच आर्यन खानच्या जामीन आदेशाची प्रतदेखील पेटीत ठेवण्यात आली होती. सकाळी ९नंतर जामीनाची कार्यवाही सुरू होईल त्यानुसार आज ११ पर्यंत आर्यन खानची सुटका होण्याची शक्यता आहे. तर, आर्यन खानला आणण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jQFWQu

No comments