पोटनिवडणूक : लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या २९ जागांसाठी मतदान सुरू
नवी दिल्ली : दादरा आणि नगर हवेली सहीत लोकसभेच्या तीन तसंच १३ राज्यांतील तब्बल २९ विधानसभा मतदारसंघात आज पार पडतेय. शनिवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झालीय. मतदानासाठी नागरिकही मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रांवर दाखल होताना दिसत आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेसहीत कोविड उपायांचाही वापर सुनिश्चित करण्यात आलाय. या निवडणुकीची मतगणना २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पश्चिम बंगाल शांतिपूर - नदिया जिल्हा, गोसाबा - दक्षिण २४ परगणा जिल्हा, खरदाहा आणि दिनहाटा या चार मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडतेय. पश्चिम बंगालच्या दिनहाटा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत मतदानासाठी नागरिक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. बिहारच्या कुश्वेवरस्थान मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदार दाखल होत आहेत. पोटनिवडणूक : तीन लोकसभा मतदार संघ लोकसभेच्या तीन जागांवर सदस्यांचं निधन झाल्यानंतर उपनिवडणुका होत आहेत. - दादरा आणि नगर हवेली - मंडी, हिमाचल प्रदेश - खंडवा, मध्य प्रदेश पोटनिवडणूक : २९ विधानसभा मतदार संघ सदस्यांचं निधन, विजयी उमेदवाराकडून पक्षबदल तसंच राजीनामा अशा अनेक कारणांमुळे विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. - आसाम : पाच मतदारसंघ - पश्चिम बंगाल : चार मतदारसंघ - मध्य प्रदेश : तीन मतदारसंघ (जोबट - अलीराजपूर जिल्हा, रैगाव- सतना जिल्हा, पृथ्वीपूर - निवाडी जिल्हा ) - हिमाचल प्रदेश : तीन मतदारसंघ - मेघालय : तीन मतदारसंघ - बिहार : दोन मतदारसंघ - राजस्थान : दोन मतदारसंघ - कर्नाटक : दोन मतदारसंघ - आंध्र प्रदेश : एक मतदारसंघ - हरयाणा : एक मतदारसंघ - महाराष्ट्र : एक मतदारसंघ - मिझोरम : एक मतदारसंघ - तेलंगणा : एक मतदारसंघ - नागालँड : नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या उमेदवाराला १३ ऑक्टोबर रोजी निर्विरोध विजयी घोषित करण्यात आलंय.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Gz0jLM
No comments