ads

Breaking News

अमरावतीत १०० हून अधिक नागरिकांना अन्नातून विषबाधा, अचानक होऊ लागल्या उलट्या, अतिसाराचा त्रास

Food Poisoning : दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर काही महिला, पुरुष व बालकांना अचानक मळमळ, उलट्या, ताप व अतिसार होऊ लागला. यामुळे शंभर ते दीडशे नागरिकांनी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी अचानक एवढे रुग्ण भरती झाल्याने रुग्णालयात एकच तारांबळ उडाली होती. रुग्णांची तपासणी केल्यानंतर या सगळ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी प्रियंका कांबळे यांनी दिली आहे. सध्या येणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर उपचार सुरू आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MZ1YOpP

No comments