ads

Breaking News

दोन्ही डोस घेणारे निर्बंधमुक्त होणार का?; अजित पवार यांनी केले मोठे विधान

पुणे: संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत असून सरकार नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेत आहे. नागरिकांनीही निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून सार्वजनिक स्थळी तसेच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी आज येथे केले. ( ) वाचा: पुणे विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील करोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. अजित पवार म्हणाले की, करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत असून सरकार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्यात सध्या करोना रुग्ण वाढीचा दर स्थिर असला तरी या आठवड्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहतील. ज्या नागरिकांनी लसचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय राज्य सरकार घेत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'नियमांचे पालन करून काही उद्योगधंदे सुरू आहेत. उद्योगपतींनीही त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढत असून आवश्यक तेवढा होत नाही. तरीही जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात येत आहेत.' जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली. वाचा: यावेळी खासदार यांच्यासह आमदार संग्राम थोपटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही काही सूचना केल्या. डॉ. सुभाष साळुंके यांनी संस्थात्मक विलगिकरण, टेस्टिंग, सुपर स्प्रेडरचे लसीकरण याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर, ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिककेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार , खासदार ॲड. वंदना चव्हाण व अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xKFEQb

No comments