ads

Breaking News

अनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त; वाझेमार्फत वसुलीचेही पुरावे!

मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री यांची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू असतानाच आज कारवाईचे पुढचे पाऊल टाकण्यात आले असून देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली ४.२० कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ( ) वाचा: बडतर्फ पोलीस अधिकारी याला अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी केला होता. त्या आरोपाच्या आधारे मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांची व सीबीआय मार्फत सध्या चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयने मूळ गुन्हा दाखल केलेला असून त्याच अनुषंगाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख व कुटुंबीयांची ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता आज जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता अनिल देशमुख यांची पत्नी आणि प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीच्या नावावर आहे. त्यात वरळी येथील १.५४ कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट आणि उरण (रायगड) येथील धुतूम गावातील २.६७ कोटी किंमतीच्या जमिनीचा समावेश आहे. पीएमएलए अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. वाचा: - वरळी येथील फ्लॅट आरती देशमुख यांच्या नावावर आहे. २००४ मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोकड स्वरूपात देण्यात आली होती. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०२० मध्ये अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना या फ्लॅटचा विक्री व्यवहार करण्यात आला, असे ईडीच्या तपासात आढळले आहे. - अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून ४.७० कोटी इतकी रक्कम लाच स्वरूपात मिळवल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचा दावाही ईडीने केला आहे. - दिल्ली स्थित डमी कंपन्यांच्या मदतीने देशमुख यांनी मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून ४.१८ कोटी रुपये आपल्या ट्रस्टसाठी मिळवले. ही रक्कम श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात दाखवण्यात आली, असा दावाही ईडीकडून करण्यात आला आहे. - देशमुख कुटुंबीयांकडे प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीची ५० टक्के मालकी आहे. या कंपनीच्या नावे जमीन, दुकाने अशी मिळून ५.३४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या कंपनीची मालकी देशमुख कुटुंबाने केवळ १७.९५ लाख रुपयांच्या बदल्यात मिळवल्याचा दावाही ईडीकडून करण्यात आला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U9zKJR

No comments