ads

Breaking News

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; वाहतूक झाली पूर्ववत

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून कोकण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणातील नद्यांना पूर आला असून पावसामुळे रस्ते वाहतुकीसह रेल्वे सेवाही () प्रभावित झाली आहे. करमाळी येथील बोगद्यात माती कोसळत असल्याने थिविम ते करमाळी दरम्यान रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होता. दुरुस्तीनंतर हा मार्ग खुला करण्यात आला. यामुळे मार्गावरील वाहतूक १९ रोजी रात्री १०.३० वाजता पुन्हा सुरू झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर करमाळी येथील बोगद्यामध्ये जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात माती कोसळली. परिणामी या ठिकाणाहून होणारी थांबवण्यात आली होती. यामुळे सावंतवाडी ते मडगाव दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते . कोणत्या गाड्यांचे बदलले होते मार्ग? रेल्वे मार्गादरम्यान बोगद्यामध्ये माती कोसळल्याने ०२६१८ हजरत निजामुद्दीन एरणाकुलम तसंच ०४६९६ अमृतसर कोचुवली साप्ताहिक स्पेशल या दोन गाड्या पनवेल - कर्जत - पुणे - मिरज- हुबळी- शोरणुर मार्गे वळवण्यात आल्या होत्या. ०२९७७ एरणाकुलम अजमेर, ०९२६१ कोचुवली पोरबंदर आणि ०१२२४ एरणाकुलम लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दुरांतो द्विसाप्ताहिक या गाड्या मडगाव- लोंढा- मिरज- पुणे -कर्जत -पनवेल यामार्गे धावतील, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं. ०११११ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकण कन्या स्पेशल या गाडीच्या प्रवाशांना थिविम ते मडगावपर्यंत रस्त्यामार्गे पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली . ०१११४ मडगाव मुंबई मांडवी स्पेशल या गाडीच्या प्रवाशांना मडगाव ते थिविम रस्तामार्गे नेण्यात आले. ०२४३२ हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस तसेच ०२४१३ मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस या गाड्यांच्या प्रवाशांना पेडणे मडगाव पेडणे असे रस्तामार्गे देण्याची व्यवस्था करण्यात आली. कोणत्या गाड्या झाल्या रद्द? १९ जुलै रोजी सुटणारी ०१११२ मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्सप्रेस आणि २० जुलै रोजी सुटणारी ०१११३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव पर्यंत धावणारी मांडवी एक्सप्रेस या गाड्या पूर्णता रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान, दुरुस्तीनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3itcoXG

No comments