ads

Breaking News

योगी सरकारची माघार, कावड यात्रा रद्द

नवी दिल्ली : कावड यात्रेला परवानगी देणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयानं गेल्या सुनावणीत तंबी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून न्यायालयासमोर उत्तर दाखल करण्यात आलंय. यामध्ये, यंदा स्थगित करण्यात येत असल्याचं सांगत उत्तर प्रदेश सरकारनं माघार घेतलीय. यंदाची कावड संघ यात्रा स्थगित करण्यासाठी सर्वांची तयारी आहे. त्यामुळे यंदा कावड यात्रा होणार नाही, असं उत्तर प्रदेश सरकारचे वकील वैद्यनाथन यांनी न्यायालयासमोर म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारनं बैठक बोलावल. या बैठकीत सर्व घटकांनी कावड यात्रा स्थगित करण्यासाठी परवानगी दर्शवली, असं वैद्यनाथन यांनी म्हटलंय. याआधी, उत्तर प्रदेशातील अप्पर मुख्य सचिव (सूचना) नवनीत सहगल यांनी यंदा कावड यात्रा रद्द करण्यात येत असल्याची माहिती शनिवारी दिली होती. राज्य सरकारच्या विनंतीनंतर कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. येत्या २५ जुलैपासून कावड यात्रेला सुरुवात होणार होती. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक वर्षी श्रद्धांळुंकडून लाखो श्रद्धाळू कावड यात्रा काढतात. गेल्या आठवड्यात करोना काळात कावड यात्रेला परवानगी देण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून हस्तक्षेप करत राज्य सरकारला निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले होते. 'धार्मिक भावनांपेक्षा जगण्याचा अधिकार महत्त्वाचा' असल्याचं सांगतानाच 'उत्तर प्रदेश सरकारनं आपल्या आदेशाचा पुनर्विचार करावा अन्यथा आम्हाला आवश्यक ते आदेश द्यावे लागतील', असा इशाराही सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिला होता.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3imMwMV

No comments