ads

Breaking News

जागेच्या वादातून हत्या; पोलिसांनी २४ तासांत उलगडला हत्येचा तपास

चंद्रपूरः जागेच्या वादातून एका इसमाची हत्या करणाऱ्या ४ आरोपींना दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. १७ जुलैला दुर्गापुर बेताल चौक झोपडपट्टी परिसरात ५० वर्षीय बंडू संदोकार यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर व दुर्गापूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे आपल्या चमुसोबत घटनास्थळ गाठून तपासाची चक्रे वेगात फिरवून ४ आरोपींना अटक केली. बंडू संदोकार यांचं जागेच्या कारणावरून बाबूपेठ येथील ५२ वर्षीय जमनाबाई शत्रूघन गंजीर यांच्याशी वाद झाले होते. ११ जुलैला झालेल्या वादाचा जमनाबाई यांनी राग मनात ठेवला होता. उमेश गंजीर व जमनाबाई यांनी मिळून बंडू संदोकारचा काटा काढण्याचं ठरवले हे पोलीस तपासात उघडकीस आले. या हत्येसाठी त्यांनी बगड खिडकी येथील २१ वर्षीय करन किसन डोंगरे, महाकाली वार्ड येथील २१ वर्षीय शंकर हनुमान तुमराम यांना ११ हजारांची सुपारी देऊन नियोजित काटा काढला. योजनेप्रमाणे आरोपीनी बंडूला दारू पाजली व त्याच्या झोपडीत पीडित इसमाच्या तोंडात दुपट्टा कोंबत गळ्याला आवळून ठार मारले. वाचाः दुर्गापुर पोलिसांच्या शिताफीने सदरील हत्येचा गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आणत ४ आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात सपोनि रोशन बावनकर, प्रवीण सोनुने, किशोर सहारे, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, अमोल घोरुडे, रवींद्र धुर्वे, मनोहर जाधव, संतोष आडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36JSeTN

No comments