आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन : विविध मुद्द्यांवर सरकार चर्चेस तयार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत पार पडली. 'विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी सरकार तयार आहे. सर्वांनी मिळून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सकारात्मक पद्धतीने पार पाडू,' असा विश्वास यांनी व्यक्त केल्याचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. सर्वच पक्षांनी आपापली मते मांडावीत, विरोधकांनीही त्यांचे मुद्दे मांडावेत. यामुळे अधिवेशन सर्वसमावेशक होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. सर्वपक्षीय बैठकीसाठी ३३ राजकीय पक्ष उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राज्यसभेतील नेते पीयूष गोयल, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी आदी बैठकीला उपस्थित होते. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी, तृणमूलचे सभागृह नेते डेरेक ओब्रायम, द्रमुकचे त्रिची सिवा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, बसपचे सतीश मिश्रा, अपना दलच्या अनुप्रिया पटेल, लोकजनशक्ती पक्षाचे पशुपती पारस या बैठकीला उपस्थित होते. ''ची बैठक संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सभागृहनेत्यांची बैठकही रविवारी झाली. मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी उपस्थित होते. याशिवाय 'अपना दल'च्या अनुप्रिया पटेल, संयुक्त जनता दलाचे रामनाथ ठाकूर, अण्णा द्रमुकचे नवनीत कृष्णन, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. विरोधक सरकारला घेरणार करोनाच्या दुसऱ्या लाटेला हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, इंधनांच्या वाढलेल्या किमती या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. दुसरीकडे १७ नवी विधेयके मांडण्याची मोदी सरकारची तयारी असून, त्यापैकी तीन विधेयके सध्याच्या विधेयकांऐवजी मांडली जातील.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xR2UMb
No comments