ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते?; 'या' काँग्रेस नेत्याने केले मोठे विधान
मुंबई: पक्षातील काही जण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. हे लोक घाबरट असून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडावा आणि नीडर लोकांना काँग्रेसमध्ये घ्यावे ही यांची भूमिका रास्त असून आमचा या भूमिकेला पाठिंबा आहे, असे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष यांनी सांगितले. ( ) वाचा: नसीम खान पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना व अनुभवी राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसचा विचार हाच देशाला तारणारा विचार असून सर्व जाती, धर्माच्या लोकांचा काँग्रेसमध्ये सन्मान राखला जातो. राहुल गांधी यांची लढाई ही फॅसिस्ट विचारांच्या लोकांशी आहे. ही लढाई लढण्यासाठी राहुल गांधी यांच्या पाठिशी आपण सर्वांनी भक्कपणे उभे राहिले पाहिजे. जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे आणि भीत्रे, घाबरट आहेत असे लोक राहुल गांधी व काँग्रेसची लढाई लढू शकणार नाहीत. म्हणून राहुल यांनी घेतलेली भूमिका एकदम रास्त असून काँग्रेस विचारांवर ज्यांची श्रद्धा आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्ष व राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. वाचा: केंद्रात सरकार आल्यापासून विरोधी पक्षांच्या लोकांना ईडी, सारख्या संस्थांच्या माध्यमातून भीती दाखवली जात आहे. या दबावाला बळी पडून, घाबरूनच काँग्रेस पक्षातील काही लोकांनी बाहेरचा रस्ता धरला आहे. काँग्रेस पक्षाने अशा लोकांना विविध पदे देऊन त्यांचा सन्मान केला पण पक्षाला गरज असताना मात्र ते घाबरून पळून जात आहेत. असे लोक पक्षातून गेले तरी न घाबरता काँग्रेस पक्षासाठी काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. राहुल गांधी यांच्या बरोबरीने हेच कार्यकर्ते फॅसिस्ट विचारांविरोधात लढा देतील, असेही नसीम खान म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UTzNJu
No comments