ads

Breaking News

'भाजप ही वॉशिंग मशीन; या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो'

मुंबई: 'भाजप हा पक्ष सध्या वॉशिंग मशीन सारखा झाला असून या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो', असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी लगावला आहे. ( ) वाचा: नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला. भाजपमध्ये येण्यासाठी कशाप्रकारे तपास यंत्रणांची भीती दाखवली जाते, याचे दाखले देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या चौकशीवरही मलिक यांनी बोट ठेवले. ' हे कॉंग्रेस पक्षात असताना त्यांच्या परळ येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे हे अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. राणे यांनी या भेटीबाबत इन्कार केल्यावरही भाजपच्या लोकांनी हा व्हिडिओ पसरवला. अशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्येही अनेक नेत्यांना भाजपात आणले गेले. ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा वापर करून अनेक नेत्यांना भाजपात येण्यासाठी भाग पाडले जात आहे किंवा तशी परिस्थिती निर्माण केली जात आहे', असा आरोपच मलिक यांनी केला. भाजपमध्ये संबंधित नेते गेल्यावर तपास यंत्रणांकडून सुरू असलेली त्यांची चौकशी अचानक बंद होते. याचे अनेक दाखले देता येतील, असेही मलिक पुढे म्हणाले. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे विधान खुद्द नितीन गडकरी यांनी केले होते, त्याची आठवणही यावेळी मलिक यांनी करून दिली. वाचा: आमच्या पक्षाचे प्रमुख यांनाही ईडीची नोटीस आली होती मात्र, ती परत घेण्यात आली. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई केली. त्यामुळे आमचे नेते किंवा कार्यकर्ता अशा नोटिशीला आणि कारवाईला घाबरणार नाही, असा इशाराच नवाब मलिक यांनी दिला. आमचे नेते ज्या तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे त्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, असा दावाही मलिक यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय म्हणून या चौकशा थांबवा, हे सांगण्यासाठी आमचा कोणताही नेता पंतप्रधान वा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीच्या अनुषंगाने त्यांचे हे विधान होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3erJmGs

No comments