ads

Breaking News

प्रकृतीबाबत अफवा : अखेर महापौर किशोरी पेडणेकर यांनीच केलं खंडन

मुंबई : महौपार किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र काही प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर किशोरी पेडणेकर यांच्या प्रकृतीबाबत अनुचित वृत्त प्रसारित करण्यात येत आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर ग्लोबल रुग्णालयामध्ये योग्य ते उपचार सुरू असून त्यांची आहे, अशी माहिती संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Mumbai Health update) दिली आहे. तसंच स्वत: महापौर यांनीही ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. प्रकृती अस्‍वस्‍थ वाटू लागल्‍याने किशोरी पेडणेकर या रुग्‍णालयात दाखल झाल्‍या आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्‍वतः महापौरांनी त्‍यांच्‍या वैयक्‍ति‍क व महापौर कार्यालय ट्व‍िटर अकाऊंटवरुन संदेश देत अफवांचे खंडन केलं आहे. 'कुठलेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी त्या वृत्ताची शहानिशा करून ते वृत्त प्रसारित करावे, अशी मी आशा करते', असं म्हणत महापौर पेडणेकर यांनी चुकीचं वृत्त देणाऱ्यांना फटकारलं आहे. 'मी जिवंत आहे आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तसेच थोड्या वेळापूर्वी दाल खिचडीही खाल्ली आहे,' असंही महापौरांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. मात्र आज त्यांचा हा त्रास वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या, अशीही माहिती आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Tnqama

No comments