ads

Breaking News

शरिराचे चार तुकडे करून चार राज्यांत फेकेन!; पीडितेच्या कारमध्ये चिठ्ठी

नागपूर: ‘पोलिसांत दिलेली तक्रार परत न घेतल्यास तुझ्या शरिराचे चार तुकडे करून चार राज्यांत फेकेन’, अशी अत्याचार पीडित महिलेला देण्यात आली. ही खळबळजनक घटना मधील परिसरात आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर पीडिता व तिच्या नातेवाइकांमध्ये दहशतीचे वातावरण असून नंदनवन पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ३१ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. ( ) वाचा: पीडित ३१ वर्षीय महिला नंदनवन परिसरात राहाते. ती मोबाइल शॉपीचा संचालक अनुप याला ओळखते. १२ जून रोजी अनुप याने या महिलेवर अत्याचार केला. यावेळी रमेश ही व्यक्तीही अनुपसोबत होती. याप्रकरणी महिलेने नंदनवन पोलिसांत तक्रार दिली असता त्याआधारे पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. दरम्यान, अनुप याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. वाचा: या साऱ्या घटनाक्रमानंतर आज पहाटे पीडित महिलेच्या कारची काच फोडून त्यात धमकीची चिठ्ठी फेकण्यात आली. ‘पोलिसांत केलेली तक्रार परत घे, अन्यथा तुझ्या शरिराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकेन. तुझ्या कुटुंबीयांनाही सोडणार नाही’, असे या चिठ्ठीत लिहिले आहे. सकाळी सदर महिलेला ही धमकीची चिठ्ठी दिसली. तिने लगेचच याबाबत नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rg8BRA

No comments